निरीक्षक खा.अशोक नेते यांनी केली रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेतील पदाधिकाऱ्यांची चर्चा.

117

विधानसभानिहाय निवडणूक प्रचाराचे केले नियोजन

दि.०४ मे २०२४

सिंधुदुर्ग : भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून सध्या कोकणात असलेले भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांनी प्रचारातील नियोजनावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या विधानसभानिहाय बैठका घेऊन खा.नेते यांनी बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, तसेच जिल्हा परिषद सर्कलमधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.

 

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, एनडीए महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.मा. नारायणरावजी राणे यांचे प्रचारार्थ तालुका कणकवली ,तालुका देवगड व तालुका वैभववाडी या ग्रामिण मंडल अध्यक्ष तसेच भाजपा व महायुतीचे विधानसभेतील पदाधिकाऱ्यांसह भेटी दरम्यान संघटनात्मक तसेच निवडणूक संबंधी नियोजनात्मक पदाधिकाऱ्यांसह चर्चा करत यावेळी आढावा घेत खा.अशोक नेते, निवडणूक निरिक्षक यांनी तालुका कणकवली ग्रामीण मंडळातील एकुण बुथ- ६२ व १४ शक्तीकेंद्र प्रमुख असून चार जिल्हा परिषद सर्कल यात खारेपटन, जाणवली, कढसुली,कलमड यांचा नियोजन घेत आढावा घेतला.

 

यावेळी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, कणकवली (पियाळी) मंडल तालुकाध्यक्ष संतोष कानडे, वैभववाडी मंडल तालुकाध्यक्ष नासीर काझी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.