भाजपाच्या कमळाला विजयी करा. आमदार देवरावजी होळी.

130
  • आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे उजेड येथील कॉर्नर सभेत मतदारांना आवाहन.

लातूर लोकसभा क्षेत्रात प्रचाराचा आज आखरी दिवस ७ मे रोजी मतदान

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

दिनांक ५ मे २०२४ गडचिरोली.

 

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लातूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार खा.सुधाकरजी शृंगारे यांच्या नावासमोरील भाजपाच्या कमळाला मतदान करून पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी लातूर लोकसभा क्षेत्रातील क्षेत्रातील शिरूर अनंतपाल तालुक्यातील मौजा उजेड येथील कॉर्नर सभेला उपस्थित मतदारांना केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महायुतीचे रुषिकेश बडदे, राजू जाधव, उत्तम कदम, भीमराव काळे, शिवाजी हजारे, नितीन कदम, विशाल पडळकर, विलास रविकर, अर्जुन हजारे, विठ्ठल हजारे, दाऊद शेख यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लातूर लोकसभा क्षेत्रात आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून ७ मे रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे.