आमदार डॉ. देवराव होळींची निराधार यश, चेतनवर मायेची पाखर

121
  • चामोर्शी, ता. ८ : अपघातात आई – वडिलांचे छत्र हरपल्याने निराधार झालेले यश व चेतन या चिमुकल्यांवर आलेले संकट ओळखून आमदार डाॅ. देवराव होळी यांनी त्यांचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली असून या बालकांवर पालकत्वाच्या मायेची पाखर घातली आहे.
  • मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या एकोडी येथील संजय जराते व त्यांची पत्नी शुभांगी जराते या दोघांचेही नुकतेच अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या दोन लहान मुलांचे मातृ-पितृछत्र नियतीने हिरावून घेतले. ही बाब समजताच आमदार डॉ. देवराव होळी यांनी मृतकांच्या परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व दोन्ही मुलांचे आपण पालकत्व स्वीकारत असल्याचे जाहीर केले. निराधार झालेल्या या दोन्ही मुलांचे आपण पालक बनून त्यांच्या भविष्यासाठी लागणाऱ्या खर्चाची यथायोग्य व्यवस्था करू, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपण करू तसेच शासन स्तरावरून मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन देत त्यांनी परिवाराला आर्थिक मदत केली. यावेळी प्रामुख्याने यश, चेतनची आजी ताराबाई जराते, मुलगा यश जराते (वय १० वर्षे) , चेतन जराते (वय ८ वर्षे) यांच्या परिवारातील सदस्यांसह, जिल्हा सचिव दिलीप चलाख, रवी धोटे, उष्टू भोयर, किशोर धोटे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.