वादळवारा, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा .आमदार डॉक्टर देवराव जी होळी

108

ठाकूर नगर येथील नुकसानग्रस्त भागाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली पाहणी

 

शासनाकडून व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडून नुकसान ग्रस्त कुटुंबाला तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंची मदत.

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली : दि ,९

गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळ वारा व गारपीट झाल्याने शेतपिकांचे व घरादारांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील ठाकूर नगर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना केले.

 

या अवकाळी पावसाने वादळ वाऱ्याने व गारपिटीने आंबा, फणस, चिकू, केळी,अन्न धान्य यांचे फार मोठे नुकसान केले आहे. तसेच विजांच्या कडकटांमुळे टीव्ही ,फ्रिज, कुलर, सोलर इत्यादी वस्तूचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतीचे व कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे व नुकसानग्रस्तांना यथायोग्य आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

याप्रसंगी त्यांनी स्वतःकडून नुकसानग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू देण्याची घोषणा केली. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू देण्यात येत असल्याची माहिती दिली.

 

याप्रसंगी त्यांनी प्रदीप वैभव, विश्वजीत बाली, रानमोनी बाली, अनिता वैभव यांच्या पडझड झालेल्या घराची पाहणी केली. याप्रसंगी मंडळ अधिकारी श्री ढोरेजी, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, तलाठी चाटे, तलाठी गुरनुले ,तलाठी ठाकूर नगरचे सरपंच सुजेल पदा , ग्रामस्थ विश्वजीत मंडल ,मोंटू अधिकारी, उत्तम सरकार, विमल दास, मनोज सरकार, विकास मंडल ,प्रशांत हलदर, कार्तिक मंडल ,रवी अधिकारी यांचे सह तालुका महामंत्री विकास मित्र, सरपंच कृष्णा मंडल विजूस मंडल प्रामुख्याने उपस्थित होते.