सौ.बिनाराणी डॉ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत करण कोठारी ज्वेलर्सच्या प्रदर्शनाची सांगता

165
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता १९ : विदर्भातील सर्वात विश्वासनीय ज्वेलरी ब्रांड म्हणून ओळखण्यात येत असलेले करण कोठारी ज्वेलर्सच्या तीनदिवासीय प्रदर्शन व विक्रीची सांगता आमदार डाॅ. देवराव होळी यांच्या पत्नी सौ. बिनाराणी डाॅ. देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत आज १९ मे रोजी करण्यात आली.
  • विविध ब्रँड चे वस्र्, मिळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील बी-फॅशन प्लाझा येथे दि. १७, १८ व १९ मे हे तीन दिवस करण कोठारी ज्वेलर्सचे भव्य प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनाला शहरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित दर्शवत विविध प्रकारचे दागिने खरेदी केले. समारोपीय कार्यक्रम सौ.बिनाराणी डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी भाजप लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे, भाजप जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे, बी-फॅशन प्लाझाचे संचालक श्री.मनोज देवकुले, श्री. शैलेश देवकुले, करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापक श्री.योगेश पाटील,सौ.माधवी पेशेट्टीवार, तिलोत्तमाताई हाजरा, हिमांशू देवकुले व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.