Home मराठी माही उराडेने पटकावले ९२.५० टक्के.

माही उराडेने पटकावले ९२.५० टक्के.

162

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : खासदार अशोक नेते संस्थाध्यक्ष असलेल्या संस्थेच्या शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी माही हंसराज उराडे हिने ९२. ५० टक्के गुण प्राप्त केले असून ती जिल्ह्यातून प्रथम असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. माहीचे वडील शेतकरी असून तिची आई आरोग्य केंद्रात परीचारीका आहे. विशेष म्हणजे तिने हे यश कोणतेही कोचिंग क्लास न लावता मिळवले आहे. डाॅक्टर होऊन आपल्याच जिल्ह्यात आरोग्यसेवा देण्याचे तिचे स्वप्न असून तिला तबलावादन, चित्रकला, नृत्याचीही आवड आहे.