पुरवठा निरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

138

ग्लोबल गडचिरोली

गडचिरोली, ता. २२ : रेशनच्या धान्याचा लाभ मिळण्यासाठी बायोमेट्रिक प्रक्रिया करून देण्याच्या कामासाठी ५०० रुपयांची लाच घेताना मुलचेरा येथील पुरवठा निरीक्षक राहुल डोंगरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार (ता. २१)

रोजी रंगेहाथ अटक केली. प्राप्त माहितीनुसार मुलचेरा येथील पुरवठा विभागात फिर्यादीने शिधापत्रिका तयार करण्यासाठी कागदपत्रे दिली होती. शिधापत्रिका तयार करण्यात आली; परंतु बायोमेट्रिक प्रक्रिया न झाल्यामुळे फिर्यादीला स्वस्त धान्याचा लाभ मिळत नव्हता तेव्हा पुरवठा निरीक्षक डोंगरे यांनी बायोमेट्रिक करून स्वस्त धान्य मिळवून देतो म्हणून फिर्यादीकडून ५०० रुपयांची लाच मागितली. परंतु फिर्यादीची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी सापळा रचून पोलिस निरीक्षक भोसले व सहकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षक डोंगरे यांना रंगेहात पकडून अटक केली आहे.