डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

117

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

चामोर्शी, ता. २३: ‘एक देश मे दो विधान, दो प्रधान ,दोन निशान नही चलेंगे’ चा नारा देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर भारताच्या संविधानाने चालावे, काश्मीरचा ध्वज वेगळा नसावा, देशात एकच प्रधान असावा यासाठी मागणी लावून धरली. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्याच प्रेरणेतूनच आज काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे शक्य झाले. परिणामी देशाचे संविधान पूर्णपणे काश्मीरलाही लागू झाले आहे . त्यांच्या या बलिदानामुळेच आज हे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन करत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी बलिदानदिनानिमित्त डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिींना अभिवादन केले. यावेळी भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज भगत,बिधान बेपारी, बैरागी, बादल शहा, विमल सेन, सुनिल मंडल, दीपक दास, सुनिल दास , कृष्णा मंडल, स्वप्नील चलाख आदी उपस्थित होते.