शिवसेना (“उ बाठा)जिल्हाप्रमुख रियाज शेख यांच्या एककल्ली कारभाराविरोधात पदाधिकाऱ्यानी दिला सामुहिक राजीनाम्याच्या ईशारा..

398

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

अहेरी: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेस च्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली त्यात डॉ. नामदेव किरसान विजयी झाले हे खरे, परंतु त्यांच्या प्रचारार्थ कॉग्रेस सोबत शिवसेनाचे (उबाठा) पदाधिकारी व शिवसैनिक जोमाने भर उन्हात प्रचार करण्यात प्रांरभ केले.परंतु जिल्हा प्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुख या दोघांनी भाजपा शी संगणनमत करुन शिवसेना पदाधिकाऱ्यांना फक्त एक दिवस प्रचारार्थ फिरण्यास सांगुन नंतर प्रचार बंद करण्यास लावले म्हणुनच गडचिरोली जिल्हातील आरमोरी, अहेरी व गडचिरोली या विधानसभा पैकी अहेरी विधानसभेमध्ये कमी प्रमाणात आघाडी मिळाली हि वस्तु स्थिती आहे. या पुर्वीहि नगरपंचायतच्या निवडणुकीत सुध्दा दुसरा पक्षाशी हात मिळवणी करुन आपल्याच उमेदवारांना पाडण्याचे षडयंत्र रचले त्यामुळे अनेक ठिकाणी विजयी होणारे उमेदवार पराभूत झाले.असा आरोप आल्लापल्ली येथील पत्रकार परिषदेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण धुर्वे, युवा सेना जिल्हाप्रमुख अहेरी दिलीप सुरपाम,संघटक बिरजू गेडाम आदी नी केला आहे.

 

शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख रियाज शेख यांचे पक्षातंर्गत कार्यप्रणाली संशायस्पद असल्याणे तसेच पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यात लावालावीचे धोरण राबवित असल्याणे या प्रमुख कारनाणे शिवसैनिकामध्ये एकजुटता राहीलेली नाही याला कारणीभुत रियाज शेख आहे. नवीन पक्ष प्रवेश केलेल्या शिवसैनीकांना शिवसेनेत सामावुन न घेता त्यांच्याशी पक्षपात करुन नाउमेद करतात. सेना भवणातुन निघालेल्या आदेशान्वये शिवसेना वर्धापण दिन हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांची जयंती व पुन्यतिथी आणी इतर कार्यक्रम राबविण्यात येत नाही परंतु याच नावाने वर्गणी गोळा करण्याचे धोरण सुरु असते शिवसेना अहेरी विधानसभा अंतर्गत मुलचेरा, एटापली, सिरोंचा, भामरागड व अहेरी असे पाच तालुके येतात या तालुक्यातील भामरागड व सिरोंचा मध्ये आजपर्यंत अधिकृत तालुका प्रमख यांची नावे जाहीर करण्यात आलेले नाही. सर्व तालुकयात एकही शाखा आज पर्यंत उघडण्यात आलेले नाही. तसेच एकाही गावात शिवसेना फलक लावण्यात आले नाही. यावरुन समजुन येते की, जिल्हा प्रमुख असुन सुध्दा पक्षाचा काम निष्ठेने करीत नाही त्यांचा एकच निष्ठा व धोरण आहे की, स्वताचा आर्थिक विकास करुन घेणे वरिष्ठ पातळीवर कार्यक्रमासाठी अधिकृत पदाधिकाऱ्यांना सोबत घेत नाही तसेच त्यांना कल्पना सुध्दा देत नाही.

शिवसेना पक्षात जिल्हा प्रमुखपद महत्वाचा सर्वोपरी असते पण अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख म्हणून काम करीत असतांना हुकुमशाही पध्दतीने पदाधिकान्यावर मानसिक दबाव टाकून त्यांचा खच्चीकरण करीत असतो असे जिल्हा प्रमुख यापदाचा वापर करुन पदाधिकाऱ्यामध्ये आपआपसात अंतर्गत कलह निर्माण करतो. तसेच पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मानसन्मान मिळत नाही त्यामुळे सर्वच नाराजी व्यक्त करीत आहे हि बाब संपर्क प्रमुख यांच्या नजरेत आणून दिल्या नंतरही जिल्हा प्रमुखांचीच बाजु घेतात यावरुन अशी शंका निर्माण होते की, संपर्क प्रमुख व जिल्हा प्रमुख यांच्यात फार मोठा आर्थिक व्यवहार झाला की, कायअशी शंका येते.

 

सुरजागड लोह खान प्रकल्पातील अधिकाऱ्यां कडून वर्गणीच्या नावावर जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुख हे दोघे सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावे हप्ता वसुल करीत असतात परंतु प्रत्यक्षात याबाबत एकही पदाधिकाऱ्यांना पक्ष संघठण बांधणीसाठी अजिबात आर्थीक मदत मिळत नाही. मि जिल्हा प्रमुख आहे मि सर्व साभाळतो कोणीच तुमच्या पर्यंत येणार नाही असे म्हणुन त्यांचेकडुन वसुली करतो याबाबत जनतेस आम्हा पदाधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दयावे लागत आहे.

 

सिरोचा येथील पुष्कर मेळाव्यासाठी एकंदरीत 74 लाखांची कामे पक्षाकडुन मिळाले असता पक्षातील एकाही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वता विल्हेवाट लावली याचा पक्षाला काहीच लाभ मिळालेला नाही..

 

पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांची आर्थीक फसवणुक केली असल्याणे अनेक पदाधिकारी पक्षापासुन दुरावत आहे.

 

यासर्व कारणामुळे सर्व पदाधिकारी सामुहीक राजीनाम्याच्या तयारीत आहेत असे पत्रकार परिषदेत अरुनभाऊ धुर्वे उपजिल्हा प्रमुख, बिरजु गेडाम अहेरी विधानसभा संघटक दिलीप भाऊ सुरपाम युवासेना जिल्हा प्रमुख इतर शिवसैनिक आपले मत व्यक्त केले