Home मराठी हिंदूंचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा विधानसभेच्या पायऱ्यावर निषेध तीव्र

हिंदूंचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा विधानसभेच्या पायऱ्यावर निषेध तीव्र

113

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा उत्स्फूर्त सहभाग

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक २ जुलै मुंबई

 

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माच्या संदर्भांत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभेच्या पायऱ्यावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत राहुल गांधी यांचा निषेध केला. याप्रसंगी भाजप नेते मुख्य प्रतोद ऍड.आशिषजी शेलार, विधान परिषदेचे नेते प्रवीणजी दरेकर ,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन ,मंत्री दादाजी भुसे यांचे सह महायुतीचे आमदार प्रामुख्याने उपस्थित होते.

 

यावेळी राहुल गांधींच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. “हिंदूओ का ये अपमान नही सहेगा हिंदुस्तान” “राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोके वरती पाय” राहुल गांधींचा धिक्कार असो निषेध असो अशा घोषणा देऊन सत्तारूढ पक्षाच्या मंत्री व आमदारांनी विधानसभेचा परिसर दणाणून सोडला. राहुल गांधींच्या वक्तव्याचा समर्थन करणारे व शिवीगाळ करणारे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचाही तीव्र निषेध करण्यात आला व राजीनामा मागण्यात आला.