काॅंग्रेस नेते राहुल गांधीं यांच्याविऱोधात भाजपचे निषेध आंदोलन

75

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. 3 : भारतीय जनता जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तसेच सर्व हिंदुवादी संघटनांच्या वतीने काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आज बुधवारी ३ जुलै रोजी स्थानिक इंदिरा गांधी चौकात सायंकाळी ५ वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

संसद भवनात समस्त हिंदूंना हिंसक म्हणून संबोधणाऱ्या आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात येणार असून भारतीय जनता जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तसेच सर्व हिंदुवादी संघटनांच्या सर्व पदधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले आहे.