गडचिरोलीच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीन उपायोजना करा

100

उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे सचिव व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे आभार

 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील  समस्या सोडविण्यासाठी विधान भवनात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली बैठक

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ५ जुलै २०२४ मुंबई

 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी व आमदार कृष्णाजी गजबे यांच्या विनंती वरून उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी विधानभवनात गडचिरोली  जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये देवेंद्रजी फडणविस यांनी  आमदारांनी उपस्थित केलेल्या सर्व विषयांना केंद्रित करून जिल्ह्यातील प्रलंबित समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडवण्यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.*

*यावेळी विवीध विभागाचे सचिव , आरोग्य विभागाचे संचालक, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री यांचे सचिव सह वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

बैठकीमध्ये जिल्ह्यातील गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेजच्या संदर्भातील असणारे विविध प्रश्न,  या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश सुरू करणे व पीएमसी ची नियुक्ती करावी,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे नवीन बांधकाम,  पीएमसी ची नियुक्ती करणे, गडचिरोली नवीन विमानतळाच्या निर्मिती संदर्भातील कार्यवाही करणे , गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे संथ गतीने होणारे बांधकाम,  दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकास मंजुरी,  पीएमसी ची मान्यता व वन विभागाचे असणारे अतिक्रमण काढणे, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील राजीव गांधी उपसा सिंचन भेंडाळा तालुका चामोर्शी , वसा पोर्ला उपसा सिंचन योजना तालुका गडचिरोली यांची  पीएमसी च्या मार्फत निवीदा प्रक्रिया करून काम सुरू करणे, कोणसरी पोलाद प्रक्रियेत जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे व त्यांच्या मागणीनुसार जमिनीचा मोबदला देणे, गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना व वाढीव गटार लाईन योजनेच्या प्रलंबीत प्रस्तावांना मंजुरी देणे,  धानोरा व चामोर्शी नगरपंचायत अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देणे, गडचिरोली,  धानोरा  व चामोर्शी  तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यास होणाऱ्या अडचणी दूर करून त्याविषयीच्या  उपाययोजना करणे,गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता १ व कार्यकारी अभियंता २ येथील   बजेट मधील निधी कामानुसार वितरित करणे, गडचिरोली जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नव्या बांधकामास मंजुरी देणे,  जिल्हा परिषदेच्या  नवीन प्रशासकीय भवनांस मंजुरी देणे ,

*गडचिरोली जिल्ह्यात नव्याने  सर्किट हाऊस  (विश्रामगृह) बांधकाम करणे,  गडचिरोली, धानोरा  व चामोर्शी  नगर पंचायत समितीच्या प्रशासकीय भवनांना मंजुरी देणे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघ, हत्ती व इतर हिंसक वन्यप्राणामुळे मृत्यू झालेल्या  परिवारांना आर्थिक भरपाई देणे व हिंसक वन्य प्राण्यांपासून मृत्यू टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहा संदर्भात  असणाऱ्या समस्या दूर करणे आवश्यक असून या बैठकीच्या माध्यमातून त्या मार्गी लावाव्यात असेल अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यानी केली असता उपमुख्यमंत्री यांनी या संदर्भात संबंधित विभागाला प्रत्येक कामाचा टाईम निर्धारित करून त्यानुसार कारवाई करावी असे निर्देश दिले.