भाजप आणि राजे फाऊंडेशनचे कार्यकर्ते धावले मदतीला.
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
अहेरी : पेरमीली येथील महीलेचा अहेरीतील बेघर काॅलनी येथील नातलगाच्या घरी मृत्यु झाला.अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटूंबावर दुहेरी आघात झाला होता.मृत्युचे दुःख आणि आर्थीक संकटामुळे हतबलता यामुळे विवंचनेत पडले. राजे अम्ब्रीशराव महाराजांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ आर्थीक मदत आणि आपले कार्यकर्त्यांना पाठवली. मृतदेह पेरमीलीला पाठवण्यासाठी वाहन व्यवस्था आणि इतर खर्चासाठी आर्थीक मदत पाठवुन दुःखाच्या प्रसंगी मोठा आधार दिला.
या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष श्री संतोष मद्दीवार,पदाधिकारी विकास तोडसाम राजे फाऊंडेशनचे सारंग रामगीरवार व धिरज तुलसीगीरीवार,गजानन कोसरे, छोटू तोडसाम,आनंद झाडे,सिध्देश सिडाम इ. कार्यकर्ते मदतीच्या कार्यात होते.









