स्फोट करून जखमी करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न फसला

148

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ६ : अभियानावरून परत येत असताना स्फोटाच्या माध्यमातून पोलिसांचा घातपात घडवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न फसला. यात दोन जवानांना किरकोळ जखमा झाल्या.

धोडराज येथून अभियानावरून परत येत असलेल्या सी-६० जवानांवर माओवाद्यांनी IED स्फोटाचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. सी-६० चे जवान रस्त्यावर शोध अभियान राबवत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोर ने स्फोट केला. यात दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत. जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. परिसरात पुढील शोधमोहीम सुरू आहे.

—————————-