२९३ वरील सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करताना जिल्ह्यासाठी केल्या विविध मागण्या
आदिवासींच्या अतिक्रमित जमिनींना कायमस्वरूपी पट्टे, वर्ग २ च्या जमिनीवर १ करणे, जंगली हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त, बंगाली बांधवांच्या जमिनींना स्थायी पट्टे यासह विविध मागण्या*
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
पेंढरी हे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या भागातील मोठे गाव असून धानोरा तालुक्यात पासून लांब अंतरावर असल्याने परिसरातील गावांना तहसील कार्यालय संबंधित कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पेंढरी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून सर्वसामान्य गरीब जनतेच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सरकारच्या २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेच्या प्रसंगी विधानसभेत केली.
यावेळी त्यांनी जिल्ह्यात परंपरेने पिढी जात राहणाऱ्या आदिवासी समाजाचे अनेक वर्षापासुन असलेले अतिक्रमण कायमस्वरूपी करून त्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे अशी मागणी केली. वर्ग २ च्या जमिनी वर्ग एक करण्याचा शासन निर्णय असताना अजूनही ते करण्यात आलेल्या नाहीत , त्यामूळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग एक करण्यात याव्यात अशी विनंती सरकारला केली . मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने हिंस्त्र प्राणी या जंगलामध्ये राहत असून त्यामुळे असंख्य निरपराध शेतकरी व सर्वसामान्य गरीब नागरिकांचा जीव गेलेला आहे त्यामुळे हिंस्त्र प्राण्यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी सरकारला केली.*
शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांबद्दल सरकारचे अभिनंदन करतानाच विस्थापित झालेल्या असंख्य बंगाली बांधवांच्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ कराव्यात अशी मागणी केली. सोबतच “शासन आपल्या दारी “या योजनेप्रमाणे “आमदार आपल्या दारी” ही योजना राबवून सरकारी योजना जनसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी ही विनंती त्यांनी या चर्चेच्या माध्यमातून सरकारला केली.









