मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे

112
  1. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना

 

चामोर्शी शहरातील ह्या योजनेच्या नोंदणी संथ गतीने दिसल्याने आमदारांनी व्यक्त केली नाराजी

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

दिनांक २५ जुलै चामोर्शी

 

राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेला यशस्वी करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. ह्या योजनेच्या चामोर्शी शहरातील नोंदणीची गती संथ दिसून आल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी नाराजी व्यक्त केली व संबंधित अधिकारी व कर्मचा ऱ्यांना या योजनेला गती देण्याची सूचना केली. व या योजनेबाबत शहरात जाणीव जागृती करून मातृशक्तीला सहकार्य करावे असे निर्देश दिले .

 

यावेळी नगर पंचायत प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जिल्हा सचिव दिलीप चलाख, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, युमो उपाध्यक्ष प्रतीक राठी उपस्थित होते.