ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली, ता. २४ : सध्या विधानसभा निवडणुकीचे रान पेटले असून एका पक्षातील एक नकली वाघ, एक सरडा आणि एका वा’नरो’बाने ‘होळी’ कशी पेटवली याची चर्चा सर्वदूर रंगत आहे. आटपाट नगरात कमळवन फुलले होते. या कमळवनात एक ‘देव’राव निवांत फिरत होता. त्याने एक नव्हे दोनदो हे कमळवन फुलवल्याने कमळाबाई त्याच्यावर खुश होती. पण जंगलातले आपले सलाईन, इंजेक्शनचे खेळ सोडून एक वा’नरो’बा या कमळवनात ‘अच्छे दिन’च्या शोधात आला. त्यामुळे कमळवनाला दृष्ट लागून बुरे दिन सुरू झाले. त्यापूर्वीच कमळाबाईने आपल्याला चांगली शिकार करता येईल म्हणून ‘नाग’ देवतेला सोडून एक नकली वाघ सेनापती नेमला. पण हा सेनापती वाघाचं कातडं पांघरलेला कोल्हाच निघाला. हा वाघ ‘अरे’ ‘अरे’ म्हणेपर्यंत कमळवनातील सर्वांमध्ये आग लावू लागला. त्याला सोबत एका सरड्याचीही होती. खरेतर हा सरडा दहा मतं जमवू शकत नाही पण कमळाबाईचा निधी हडपण्यात याचा हातखंडा आहे. मग हा नकली वाघ आपले एकच ‘नेते’ असल्याच्या थाटात राहू लागला. वा’नरो’बालाही कमळवनावर कब्जा करायची इच्छा होतीच. त्यामुळे हे तिघेही एकत्र येऊन उचापती करू लागले. आता कमळवनातच यांनी ‘होळी’ पेटवली आहे. त्यांच्या उचापती कमळाबाईच्या अद्याप लक्षात न आल्याने या ‘होळी’ने कमळवनच भस्मसात होण्याची शक्यता आहे.
———————————–