मुलांना मोबाईल देता? पण जरा जपून! गेमिंग अँपवर मैत्री करून केला अत्याचार

108

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना महागडे अॅंड्राॅईड मोबाईल सहज घेऊन देतात. त्यातून किती भयंकर गोष्टी घडू शकतात याचा प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आला. ‘फ्री फायर’ या ऑनलाइन गेमींगच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या एका तरुणाने थेट अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवार (ता. १२) उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी (वय २२) रा. मालेगाव, जि.नाशिक, असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार अहेरीच्या एका १४ वर्षीय मुलीची त्याच्याशी फ्री फायर हा ऑनलाFन गेम खेळताना ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटींग व्हायची. त्यानंतर फोनवरtन बोलणे सुरु झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने ११ जानेवारीला नाशिकहून अहेरी गाठले. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यावेळी त्याने मुलीच्या घरी मुक्काम करून अत्याचार केला.दरम्यान, सकाळी काही लोकांना पीडित मुलीच्या घरी अनोळखी तरुण असल्याची कुणकुण लागताच त्यांनी मुलीच्या घरातून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवून कलम ६४०(१),६५ (१) भारतीय न्याय संहिता,सह कलम ४,६ लैंगिक अपराधापासून बालसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या घटनेमुळे अहेरीतील पालकांना धक्का बसला आहे. आरोपी मोहम्मद सौद अन्सारीला सोमवार (ता. १३) अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे आरोपी व अल्पवयीन मुलगी जवळपास एक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते.

————————————-