शाळा व्यवस्थापन समितीचा उपक्रम
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, दि,१६ चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कुनघाडा रैय्यतवारी येथील जि. प. केंद्र शाळेतील विद्यार्थी नेहमीच नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा पात्र असतात केंद्र शाळेबद्दल सर्वत्र वाहवा होत असते अशातच वृक्षारोपण कार्यक्रमाचा एक उपक्रम “झाडे लावा झाडे जगवा” झाडे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. पर्यावरण सुशोबित करणे ह्या व्यतिरिक्त देखील झाडे खूप काही करतात. आपल्या आजूबाजूचा कार्बन डायऑक्साइड सोशून, आपल्याला प्राणवायू देतात. झाडे आपले उनापासून सौरक्षण करतात. याचाच एक भाग म्हणून शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेचं सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने शालेय व्यवस्थापन समितीने वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेतले. सदर वृक्षारोपणाला कुनघाडा ग्रामपंचायतीचे सरपंचा सौ. अल्का धोडरे, उपसरपंच अनिल कुनघाडकर, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार, माजी सरपंच अविनाश चलाख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश गझलपेल्लीवार तसेच सर्व सदस्य, मुख्यध्यापिका गीता शेंडे, प्रमोद बोरसरे, गुरूदास सोनटक्के, अनिल दुर्गे, अंजली तंगडपल्लीवार, विजय दूधबावरे, अभिषेक लोखंडे, ज्ञानदेवी कुनघाडकर, अश्विनी उराडे व विद्यार्थी उपस्थित होते.









