मोटारसायकलने धडक देणारा आरोपी एक वर्षासाठी तुरुंगात

104

चामोर्शी ,ता. १६ : भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याप्रकरणी चामोर्शी न्यायालयाने आरोपी मोटारसायकलस्वारास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवार (ता. १६) सुनावली. रविंद्र गोविंदा उर्फ भैय्याजी भाकरे रा. जयरामपुर ता. चामोर्शी जि. गडचिरोली, असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार १५ जून २०२० रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास फिर्यादी अमोल मारोती येगडवार व त्याचे वडील मारोती गाठू येगडवार घरासमोरील रस्त्याच्या बाजुला मुधोली बस स्टॉपवर उभे होते. रस्त्यावरून आरोपी रविंद्र गोविंदा उर्फ भैय्याजी भाकरे भरभाव व निष्काळजीपणे मोटारसायकलने आला व सरळ मारोती येगडवारच्या अंगावर मोटारसायकलने जोरदार धक्का दिला. त्यामुळे मारोती येगडवार १५ ते २० फुटपर्यंत फेकल्या गेले. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर स्वररूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याकरीता फिर्यादी अमोल मारोती येगडवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून चामोर्शी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. तपासाअंती दोषारोपपत्र न्यायायलयात दाखल करण्यात आले. आरोपी विरुद्ध केस सिद्ध कारण्याकरिता सरकारी पक्षातर्फे एकूण ८ साक्षदार तपासण्यात आले. न्यायालयाने सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा सखोल युक्तिवाद एकल्यानंतर आरोपीला १ वर्षे साधा कारावास व १,००० रुपये. दंड तसेच ६ महीने साधा कारावास व १,००० रुपये. दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास २ महीने साध्या कारावासाची शिक्षा तसेच मृतकाच्या परीवाराला ५,००० रुपये नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एस. एम. सलामे यांनी युक्तिवाद केला. प्रकरणाचा तपास ज्ञानेश्वर लाकडे यांनी केला, तर कोर्ट पैरवी म्हणून टी. आर- भोगाडे यांनी काम पाहिले.

——————————–