रोड ओपनींगासाठी गेलेल्या पोलिस शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू

183

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १३ : विशेष कृती दल / SAG गडचिरोली येथे कार्यरत असणारे पोलिस शिपाई रवीश मधुमटके (वय ३४) यांचा बुधवार (ता.१२) संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी पोलिस शिपाई रवीश मधुमटके आपल्या पथकासोबत रवाना झाले होते. यादरम्यान पोलिस स्टेशन कोठीपासून ५ किलोमीटर चालल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यांना तात्काळ भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्र/आरएचसी येथे हलवण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. त्यांचा अंत्यविधी गडचिरोली येथे होणार आहे.