Home Gadchiroli पतीने पत्नीवर वासल्याने वार करत केले गंभीर जखमी

पतीने पत्नीवर वासल्याने वार करत केले गंभीर जखमी

132

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

आरमोरी, ता. २८ : तालुक्यातील कोजबी येथे पतीने पत्नीवर वासल्याने वार केल्याने पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवार (ता. २७) रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. ताराचंद येळमे (वय ५५) असे पतीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे गुरुवारी रात्रीचे अंदाजे १२ वाजताच्या सुमारास पती ताराचंद येळमे याने पत्नीवर वासल्याने वार केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पती ताराचंदने स्वतःलाही चाकुने भोकसल्याने तोसुद्धा गंभीर जखमी झाला. दोघेही पती-पत्नी गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलवल्याची अंदाजे माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती कोजबी येथील पोलिस पाटील माधुरी सहारे यांनी पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर दाखल होऊन घटनेच्या पंचनामा सुरू केला आहे. मात्र पतीने पत्नीवर हा एवढा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणाने केला हे मात्र अद्याप कळू शकले नाही.