दोन वर्षांपासून फरार असलेली महिला आरोपी अखेर जेरबंद

171

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १३ : आंबेशिवणी येथील दोन वाघांच्या शिकार प्रकरणी फरार झालेल्या महिला आरोपीला वनविभागाने हरीयाणा राज्यातून अटक केली आहे. सुमनदेवी असे या महिला आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार महचिरोली वनविभागाअंतर्गत चातगाव वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र आंबेशिवणी येथील राखीव वन कक्ष ४१२ व ४१३ चे सिमेमध्ये २ वाघांची सापळे लावून शिकार करण्यात आली होती. याच शिकारीतील वाघाचे कातडे व १७ किलो हाडे गुवाहाटी येथे आसाम वनविभाग, पोलिस व WCCB यांनी संयुक्त कारवाई करून आरोपीला पकडले व गुन्ह्याची नोंद केली होती. जप्त मुद्देमाल हा गडचिरोली वनविभागातील आंबेशिवणी जंगलात शिकार केलेल्या वाघांचा असल्याचे समजले. यावरून २३ जुलै २०२३ च्या रात्री आंबेशिवणी गावात मुसाफिर म्हणून राहत असलेल्या हरियाणा व पंजाब राज्यातील लोकांच्या झोपड्यांवर धाड टाकण्यात आली. त्यात त्यांच्याकडून शिकारीच्या साहित्यासह वाघाची तीन नखे जप्त करण्यात आली. एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. ५ आरोपींना गुवाहाटीच्या कारागृहातून चौकशीकरिता ताब्यात घेतले व फरार आरोपी १७ होते. गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार व गडचिरोली वनविभागाचे उपधनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अंचरलाल मडावी यांनी चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्या नेतृत्वात चातगाव वनपरिक्षेत्रातील कर्मच्या-यांची चमू तयार केली. प्राप्त गोपनीय माहितीनुसार हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील तेहा-बहोत या गावातून WCCB चे वन्यजीच निरीक्षक डॉ. प्रगतीश यांच्या सोबत वनविभाग गडचिरोलीच्या टिमने संयुक्त कारवाईर् करून फरार आरोपी सुमनदेवी हिला अटक केली. या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह वनपाल साईदास मडावी, वनपाल धनश्री दिकोंडावार, वनरक्षक हिना पदा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.