श्री हनुमान जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

228

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १४ : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या गडचिरोली शाखेच्या वतीने शनिवार (ता. १२) स्थानिक श्री क्षेत्र सेमाना देवस्थान येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री विष्णूजी देशमुख, आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, चंद्रपूर विभाग मंत्री पराग दवंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विश्व हिंदू परीषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या शिबिराला जिल्हा संघ चालक घिसूलाल काबरा यांनी आवर्जून भेट दिली.

या आरोग्य शिबिरासाठी विनय मडावी, अनुप असाटी, बालाजी भांडेकर ,आयूष न्यालेवार, राहुल कन्नमवार, योगीता दशमुखे, तिलोत्तमा हाजरा, सुजल बोधलकर, मोहित निमजे, रोहन कुमरे, आर्यन चापले, शंतनू दूधबळे, बंटी कोथळकर, गुणवंत खोबरागडे आदींनी सहकार्य केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमुने आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले. या शिबिराचा लाभ ३०० हून अधिक नागरिकांनी घेतला.