ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २३ : राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके २५ व २६ गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
त्यांच्या नियोजनत दौरा कार्यक्रमानुसार २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मंत्री प्रा. अशोक उईके हे जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा प्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या धान खरेदी योजनेचा व इतर विकासकामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत ते अहेरी येथील विश्रामगृहात आदिवासी विद्यार्थी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करतील. त्यानंतर सकाळी १० ते १२ वाजता दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे प्रकल्प कार्यालय तसेच धान खरेदी योजनेचा आढावा घेतला जाईल. दुपारी १ ते ३ या वेळेत ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे आयोजित लाभार्थी संमेलनात सहभागी होतील आणि त्यानंतर दुपारी ३ वाजता तेथेच पत्रकार परिषदेला संबोधित करतील, असे कळवण्यात आले आहे.










