पहलगाव येथील हत्याकांड, आज कारगील चौकात श्रद्धांजली वाहणार

282

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, प्रतिनिधी :- ता ,२४: जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दुर्देवी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २८ जणांना कारगील चौक स्मारक येथे २४ एप्रिल ला संध्याकाळी ७ वाजता भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येणार असून या हत्याकांड चा निषेध करण्यात येणार आहे.

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली च्या वतीने श्रद्धांजली चा कार्यक्रम २४ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे.मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या देशभक्तना श्रद्धांजली वहण्यासाठी समस्त नागरिकांनी मेणबत्ती आणून कारगील चौकात श्रद्धांजली वाहवी आणि या घटनेचा निषेध करावे,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केले आहे.

 

आपला

उदय धकाते

अध्यक्ष

कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली.