Home Gadchiroli पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गडचिरोलीत जोरदार आंदोलन

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गडचिरोलीत जोरदार आंदोलन

162

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २७ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण व भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गडचिरोली शहरात विश्व  हिंदू परिषद, बजरंग दल व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय जनता पक्षयांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा गांधी चौकात तीव्र आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली.

दहशतवादी हल्ल्यात देशातील विविध राज्यांतील जवळपास २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ६ महाराष्ट्रीय नागरिकांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. या अमानुष हल्ल्यामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये संतापाची लाट उसळली असून निदर्शनादरम्यान इस्लामिक दहशतवाद व पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. “इस्लामिक आतंकवाद मुर्दाबाद!”, “पाकिस्तान मुर्दाबाद!” या घोषणांनी चौक दणाणून गेला. शहीद पर्यटकांना श्रद्धांजली वाहताना सर्व आंदोलनकर्त्यांनी काही क्षण मौन पाळले. हातात फलक व घोषवाक्य घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले की, हा हल्ला एका व्यक्तीवर नाही, तर आपल्या देशाच्या एकतेवर आहे. धर्म पाहून हत्या करणे ही मानवतेच्या विरोधातली क्रूरता आहे. अशा प्रवृत्तींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.ही केवळ दुःखद नव्हे,तर संतापजनक बाब आहे, असेही ते म्हणाले. यावेळी “तुम जातीवाद से तोडोगे, हम राष्ट्रवाद से जोडेंगे!” अशा घोषणा देत समाजिक ऐक्य व राष्ट्रप्रेमाचा संदेशही देण्यात आला. या निषेध आंदोलनात जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा,  माजी  खासदार डॉ. अशोक नेते, विश्व हिंदु परीषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे,  अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे नेते प्राचार्य धमेंद्र मुनघाटे,बजरंग दलाचे नेते विनय मडावी,ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,आदिवासी मोर्चाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, डॉ. चंदा कोडवते, माजी तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, शिवसेनेचे नेते राजूभाऊ कावडे, तालुका महामंत्री बंडू झाडे, जिल्हा सचिव सुभाष गणपती,अभिलाष कुनघाडकर, प्रणय मस्के,राकेश राचमलवार यांच्यासह युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना केंद्र सरकारने या प्रकारावर कठोर भूमिका घेत दहशतवाद्यांविरुद्ध निर्णायक कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.पोलिस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले.

————————————