पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ २५ एप्रिलला निदर्शने

224

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. २४ : निष्पाप हिंदू भाविकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्त २५ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक इंदिरा गांधी चौकात सायंकाळी ६. ३० वाजता निषेध निदर्शने करण्यात येणार आहेत.

हिंदूंच्याच देशात हिंदूंना पोशाख उतरवून, धर्म विचारून जनावरांसारखे मारले जाते. या विरोधात आपण एकत्र येऊन निषेध नोंदविला नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ज्या पद्धतीने घरी एखादा कार्यक्रम असल्यास कुटुंबाच्या भावनेने आपण एकत्र येतो, त्याच पद्धतीने आपल्याला एकत्र येऊन हिंदुविरोधी मानसिकतेचा विरोध करणे आवश्यक आहे. या अमानुष कृत्यात बळी गेलेल्या निष्पापांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासह या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

-आयोजक:

विश्व हिंदू परिषद गडचिरोली

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गडचिरोली

सकल हिंदू समाज

हिंदू धर्म मानणारे सर्व जागृत हिंदू