भाजपाच्या ‘संघटन पर्व – गाव बस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत पुर्व विदर्भ विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न

131

मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती.

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 नागपूर ,दिं. २९ : भाजपाच्या ‘संघटन पर्व – गाव बस्ती संपर्क अभियान’ या उपक्रमांतर्गत पुर्व विदर्भ विभागाची विशेष आढावा बैठक राजवाडा पॅलेस महाल नागपुर येथे भव्य आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे प्र.कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती.

या आढावा बैठकीस भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

या बैठकीत अभियानाच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. गाव पातळीपासून ते बस्त्यांमध्ये संघटन बळकट करण्यासाठी अभियानाचे प्रमुख टप्पे, नियोजन, संवादाच्या कार्यपद्धती यावर सखोल चर्चा झाली. प्रत्येक गाव व बस्तीत अधिक प्रभावी संपर्क साधण्यासाठी स्थानिक पातळीवर आखलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

 

या बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, मोर्चा प्रमुख, आणि प्रभारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने या अभियानास अधिक वेगाने राबवण्याचा निर्धार केला.