कुनघाडा रैय्यतवारी येथे महसूल व ग्रामविकास अधिकारी पूर्णवेळ नियुक्ती करा

298

ग्लोबल गडचिरोली न्यूज ,

चामोर्शी, ता. १८ : तालुक्यातील कुनघाडा रैय्यतवारी येथील महसूल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त असून ही पदे तत्काळ भरून अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षद भांडेकर यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै हे गाव लोकसंख्येने व विस्ताराने बरेच मोठे आहे. १५ सदस्यीय ग्रामपंचायतीअतंर्गत एकूण पाच वाॅर्डांचा समावेश असून लोकसंख्या दहा हजाराच्या घरात आहे. येथील तलाठी कार्यालयात महसूल अधिकारी म्हणून मेश्राम कार्यरत होते. मात्र त्यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यामुळे हे पद रिक्त आहे. तसेच ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी कुनघाडकर यांची विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती होऊन दुसरीकडे स्थानांतरण झाल्यामुळे तेही पद रिक्त झाले आहे. दोन्ही पदे महत्त्वाची व कामाची ही पदे तत्काळ भरणे अत्यावश्यक आहे. पदे रिक्त असल्यामुळे गावात अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे दोन्ही पदे तत्काळ भरावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षद भांडेकर यांनी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

——————————