राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती भाजपा कार्यालय गडचिरोली येथे उत्साहात साजरी.

126

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली , ता. ३१ : भारताच्या इतिहासात आपल्या कार्यकर्तृत्वाने एक अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, भाजपा शहर शाखा व विविध मोर्चा गडचिरोली यांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी बोलताना मा.खा.डॉ.अशोकजी नेते म्हणाले, “आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वाहून घेतलेल्या अहिल्याबाईंचे जीवन हे भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसुधारणेच्या दिशेनी सर्वानी कृती करावी, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.

 

जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मंदिर स्वच्छता, शिवलिंग महापूजा, जलाभिषेक या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आला.

 

पुढे आपल्या भाषणात मा.खा. डॉ.अशोकजी नेते बोलतांना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेनुसार देशभर साजऱ्या होणाऱ्या जयंतीच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे उध्वस्त केली होती. त्यानंतर देशभरातील अनेक मंदिरांचे पुनर्निर्माण करून हिंदू संस्कृतीचे रक्षण करणारे कार्य राजमाता अहिल्याबाईंनी केले. त्या केवळ एक राणी नव्हत्या, तर श्रद्धा, एकता आणि संस्कृती यांचे जीतेजागते प्रतीक होत्या.”

 

या जयंती सोहळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, आदिवासी आघाडी मोर्चा जिल्हा प्रमुख डॉ. नितीनजी कोडवते, डॉ. भारत खटी, कामगार आघाडी प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष दत्तु सुत्रपवार, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी भाजपा अध्यक्ष विलास पा. भांडेकर, माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,वर्षा शेडमाके, अल्काताई पोहनकर, भूपेंद्र कुळमेथे, वासुदेव बट्टे,विनोद देवोजवार, केशव निंबोड, मंगेश रणदिवे, अनिल करपे,दिपक सातपुते, सोमेश्वर धकाते यांच्यासह विविध मोर्चांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भाजपा गडचिरोली शहर व सर्व मोर्चांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचे स्मरण आणि त्यांच्या आदर्शांचे मनन करण्यात आले.