गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष पदी प्रा. रमेशजी बारसागडे यांची निवड –मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .

135

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली , ता.३१ : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी प्रा. रमेशजी बारसागडे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी चामोर्शीत प्रा. रमेशजी बारसागडे यांना पुष्पगुच्छ देत मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.खा. डॉ. नेते यांनी सांगितले की, “प्रा. रमेश बारसागडे सर यांचे संघटन कौशल्य व सामाजिक कार्याचा अनुभव भाजपा जिल्ह्याच्या संघटनेस नवे बळ देईल. याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री सलिम शेख, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, जेष्ठ नेत्या पुष्पा करकाडे,यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.