Home Gadchiroli गीता हिंगे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

गीता हिंगे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

225

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १० : सामाजिक न्याय विभागाकडून दिला जाणारा ;डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण’ पुरस्कारासाठी आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष गीत हिंगे यांची निवड झाली आहे.

शासनाने आतापर्यंत त्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली, ही गडचिरोलीसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार १० जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, नरीमन पॉइंट, मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, लोकसभा सदस्य अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे. अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी गीता हिंगे यांची गडचिरोली जिल्ह्यातून निवड झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

——————————