ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २० : जिल्ह्यातीव शहरातील नागरिक अनेस समस्यांनी बेजार झाले असून या समस्या तत्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा एमआयएम पक्षाने दिला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन द्यावी, गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहप्रकल्प, कोनसरी लोहप्रकल्प, हेडरी लोह प्रकल्प किंवा इतर कोणत्याही येणाऱ्या कंपन्यांमध्ये गडचिरोलीतील स्थानिक बेरोजगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, निवृत्त झालेले कर्मचारी यांना रुजू करताना कोणताही भेदभाव न करता सरसकट अबकड श्रेणीने रुजू करावे, वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, शहरातील फूटपाथ दुकानदारांसाठी हॅाकर्स झोन उभारण्यात यावा, अतिक्रमणधारकांना जागेचे पट्टे देण्यात यावे, नगर परीषदेतर्फे नवीन भूखंडधारकांना आणि अतिक्रमणधारकांना घरटॅक्स लागू करण्यात यावे, गडचिरोली शहरातील धुणी, भांडी करणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करण्यात यावा, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचे मानधन तीन हजार रुपये करावे, या सर्व मागण्या तत्काळ पूर्ण कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाशिद शेख, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबाळे, महिला जिल्हाध्यक्ष आयशा अली सय्यद, किरण सहारे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, जिल्हा महासचिव मुकेश डोंगरे, युवा आघाडी शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, महबूब मलिक, राकेश वेस्कडे, शहबाज शेख, सलाम शेख, रामराव खंडारे,इरफान सैफी, रेहान शेख, जिशान शेख आदींनी दिला आहे.
—————————–










