ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २५ : महावितरण कंपनीकडून ग्राहकांची सर्रास लूट थांबविण्यासाठी एआयएमआयएम पक्षातर्फे २५ जून २०२५ रोजी वीजबिलाची होळी करून निषेध करण्यात आला. तसेच महावितरण कंपनी, भाजप सरकार, ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करून वीजबिल कमी करण्याची मागणी करण्यात आली.
एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष बाशिद शेख, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बांबोळे, जिल्हा सचिव सिद्दिक मन्सूरी, महिला जिल्हाध्यक्ष आयशा अली सय्यद, महिला कार्याध्यक्ष शगुप्ता शेख, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, नसीमा शेख, तेजराम नेतनकर, वासुदेव मडावी, प्रफुल्ल येरमे, अनिल संतोषवार, कोमल राजपूत, विलास बावणे, प्रभाकर अलाम, दिवाकर खोब्रागडे, सपना खोब्रागडे, सरीता बावणे, शोभा शेरकी, निर्मला दामले, जमना राजपूत, रेखा शेंदे आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना महावितरण कंपनीकडून ग्राहकांची भरमसाठ लूट होत आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरी महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा केला जातो प्रत्येकांच्या घरी विद्युत साधन तेवढेच असून वीजपुरवठासुद्धा तेवढाच आहे. परंतु महावितरण कंपनीकडून स्थिर आकार, इतर आकार, शुल्क दुपटीने वाढ करून ग्राहकांची सर्रास लूट महावितरण कंपनीकडून होत आहे. नागरिकांचे दोन वर्षापूर्वी ज्या ग्राहकांचे विद्युत आकारणी कर बाराशे ते पंधराशे रुपये होते त्यांना आता तीन हजार रुपये विद्युत आकारणी कर देऊन जनतेची दिशाभूल करून सर्रास लूट महावितरण कंपनीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून होत असलेली ग्राहकांची लूट थांबवावी. ३० दिवसांत विद्युत ग्राहकांची लुटमार बंद झाली नाहीं तर महावितरण कंपनीच्या कार्यालयात परिकात्मक प्रेत तिरडीवर मांडून अंतिम संस्कार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
—————————










