गीता हिंगे यांच्याकडे आता भाजप जिल्हा महामंत्री पदाची जबाबदारी

150

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १० : भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांची भाजपच्या जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.

गीता हिंगे या गेल्या अनेक वर्षापासून आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मुळातच त्यांच्यात नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्य असल्यामुळे इथेही महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबरोबर त्यांनी महिलांची संघटन बांधणी सुरू केली. काही दिवसातच पक्षात मोठ्या प्रमाणात महिलांचे संघटन उभे केले. जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याझाल्याच महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर लोकसभेची निवडणूक व लगेच विधानसभा निवडणूकीची जबाबदारी आली. त्या सामाजिक क्षेत्रातून आल्या असल्यामुळे राजकारणातला फारसा अनुभव नसतानासुद्धा न डगमगता दोन्ही निवडणुकांच्या जबाबदाऱ्या सर्वांना सोबत घेऊन सक्षमपणे पार पाडल्या. त्यांच्या नेतृत्वात अनेक उच्चविद्याविभूषित महिलांनी पक्षात प्रवेश केला. महिला पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रदेशावरून आलेले कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभर राबवले आणि कौतुकास पात्र ठरल्या. त्यांच्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांना पदोन्नती देऊन भाजपच्या जिल्हा महामंत्री पदी त्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार डॉ. अशोक नेते , भाजप जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे , गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार,माजी आमदार डॉ. देवराव होळी , माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी , माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांना दिले आहे.

————————————-