गडचिरोली जिल्ह्याची डोळ्यांची पारणे फेडणारी योगासन स्पर्धा संपन्न

265

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली च्या बालयोगपटूनी केले सर्वांना मंत्रमुग्ध

 

गडचिरोली, ता. ११: महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोशिएशन अंतर्गत गडचिरोली जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोशिएशन च्या वतीने शासकीय विज्ञान महाविद्यालय, सेमाना रोड गडचिरोली येथील बहुउपयोगी हॉल मध्ये नुकत्याच १० ते ५५ वयोगटातील योगासन स्पर्धा पार पडल्या. ह्या स्पर्धा सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर, सिनियर, सिनियर B आणि सिनियर ८ अशा वयोगटात विभागल्या गेल्या होत्या. यामध्ये वैयक्तिक प्रकारात टेडीशनल, फारवर्ड बेंडिंग, बकवर्ड बेडिंग, ट्वीस्टीग, लेगबैलेंस, हैण्ड बैलेंस, सुपाइन, रिदमिक आणि आर्टिस्टिक अशा नउ प्रकारात ह्या स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेच्या उद्घाटना करीता अध्यक्ष म्हणून सायंस कॉलेज चे गणित विभागाचे प्रमुख डॉ. राहुल मापारी आणि प्रमिख अतिथि म्हणून गडचिरोली जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोशिएशन चे अध्यक्ष श्री. धनराज कांबळे, गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग असोशिएशन चे सचिव श्री. यशवंत कुरुडकर तसेच शारीरिक शिक्षक श्री. संजय मानकर यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक योग असोशिएशन चे सचिव डॉ अनिल एन निकोडे यांनी केले. तसेच पंच म्हणून सौ. वसुधाताई बोबाटे, श्री धनराज कांबळे श्री यशवंत कुरुडकर, श्री. विशाल भांडेकर डॉ. अनिल एन. निकोडे आणि तांत्रिक अधिकारी म्हणून श्री. अजित खोब्रागडे, अक्षय विश्वास, अभिनंदन भोयर, स्पर्धा व्यवस्थापण श्री. संजय मानकर यांनी काम पाहले. स्पर्धे मध्ये एकूण ५५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये आपआपल्या वयोगटातुन ज्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविला त्यांची ६ वी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. राज्यस्तरीय योगासन स्पर्धा ही सब ज्यूनियर आणि ज्युनियर यांची संगमनेर (नाशिक), सिनियर वरोरा (चंद्रपूर) आणि मास्टर ग्रुप ची संभाजीनगर येथे ऑगस्ट मध्येच होणार आहे.

 

यामध्ये ट्रेडिशनल आणि वैयक्तिक प्रकारात वयोगट १० ते १५ मुले -आर्या अरविंद भैसारे यांचा प्रथम क्रमांक, कौस्तुभ गौरव हेमके वैयक्तिक प्रकारच्या आसनामध्ये प्रथम क्रमांक, वयोगट १० ते १४ मुली स्वरा चैतू उसेंडी, प्रथम क्रमांक (ट्रेडीशनल आणि वैयक्तिक), प्रांजली प्रमोद वरगंटीवार, द्वितीय (ट्रेडीशनल), रोहिणी धनराज कांबळे, तृतीय (ट्रेडीशनल), आणितृतीय (ट्रेडीशनल), आणि

 

वयक्तिक प्रकारात दुर्वा रवींद्र कुडकावार प्रथम, सेजल अरविंद कापगते -प्रथम, आस्था राकेश तलमले प्रथम, प्राजक्ता प्रमोद वरगंटीवार – प्रथम, रोहिणी धनराज कांबळे, प्रथम आणि प्रांजली प्रमोद वरगंटीवार- प्रथम ( आरटीस्टिक सिंगल) तसेच वयोगट १४ ते १८ मुले – आयुष सचिन ब्राम्हणवाडे – प्रथम (ट्रेडीशनल आणि वैयक्तिक) वयोगट १४ ते १८ मुली -अनुष्का अरविंद भैसारे प्रथम ((ट्रेडीशनल आणि वै यक्तिक), करिष्मा राजेश्वर मातेरे -द्वितीय (ट्रेडीशनल), कल्याणी राजेश्वर मातेरे – तृतीय ( ट्रेडीशनल), वयोगट १८ ते २८ मुले रितिक पत्रूजी पुठठावार – प्रथम ( ट्रेडीशनल), वयोगट १८ ते २८ मुली प्रणाली अरुण कपाट – प्रथम ( ट्रेडीशनल आणि वैयक्तिक), टीना भाऊराव धोटे- द्वितीय (ट्रेडीशनल), भाग्यलक्ष्मी हरिदास नैताम तृतीय (ट्रेडीशनल), वयोगट २८ ते ३५ पुरुष -विशाल माधव भांडेकर प्रथम (ट्रेडीशनल आणि वैयक्तिक, अभिनंदन के. भोयर द्वितीय। ट्रेडीशनल), अजित खोब्रागडे तृतीय। ट्रेडीशनल वयोगट २८ टे ३५ महिला शीतल व्ही. येललेवार प्रथम (ट्रेडीशनल आणि वैयक्तिक, खेहा रत्नाकर वाणी द्वितीय (ट्रेडीशनल), आश्विनी एन. ढोंगले तृतीय (ट्रेडीशनल आणि वैयक्तिक प्रकारात प्रथम क्रमांक शीतल व्ही येल्लेवार, स्नेहा आर वाणी. आश्विनी एन. ढोंगले. वयोगट ३५ टे ४५ महिला चंदा डी. ठेंगे प्रथम ट्रेडीशनल। दीपिका व्ही. बोन्देलवार द्वितीय ट्रेडीशनल, रमा ए. भैसारे तृतीय । ट्रेडीशनल) वैयक्तिक प्रकारात रमा अरविंद भैसारे प्रथम, दीपिका विजय बोन्देलवार प्रथम, वयोगट ४५ ते ५५ पुरुष धनराज धोडूजी कांबळे प्रथम ट्रेडीशनल वयोगट ४५ ते ५५ महिला – वसुधाताई बोबाटे प्रथम (ट्रेडीशनल), वर्षा प्रवीन मोडक द्वितीय, आल्लेवार तृतीय, आणि वैयक्तिक मध्ये वसुधाताई बोबाटे, वर्षा पि. मोडक, क्रमांकाचे मानकरी ठरल्या आहे आणि शिल्पा पि. शिल्पा आल्लेवार प्रथम

एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वच वयोगटातून खेळाडूची राज्यस्तरावर निवड होणे ही गडचिरोली जिल्यातील पहिलीच ऐतिहासिक घटना होय हे विशेष. या सर्वांना डॉ. अनिल एन निकोडे एन. आय. एस. योगप्रशिक्षक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हे सर्व आपल्या यशाचे श्रेय गुरुजन वर्ग, मित्र परिवार आणि आपल्या आईवडिलांना देतात. यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे