ग्लोबल गडचिरोली न्यूज ,
गडचिरोली, ता. ७ : धानोरा शहरातील आधार कार्ड केंद्र अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आधार अपडेटसाठी गडचिरोलीला जाऊनही दोन-तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत होती.
ही समस्या लक्षात घेऊन आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि तहसीलदार गणेश माळी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून या सोमवारपासून धानोरा तहसील कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरू होणार आहे.
तसेच, पंचायत समिती धानोरा येथे दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी आधार कार्ड केंद्र नियमितपणे सुरू राहणार आहे.
यामुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि अनावश्यक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल. धानोरा शहर व परिसरातील जनतेसाठी ही अत्यंत दिलासादायक व सोयीची सुविधा ठरणार आहे.










