Home Gadchiroli आरोग्य सेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

आरोग्य सेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न; तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

186

गडचिरोली, ता. ८ : तालुका आरोग्य अधिकारी वेतनवाढीसाठी शरीरसुखाची मागणी करत असल्याने त्रस्त झालेल्या आरोग्य सेविकेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर गडचिरोली पोलिसांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलचेरा येथील कंत्राटी आरोग्य सेविका (C-ANM) यांनी ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री (वय ५0) यांनी या कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांना वेतनामध्ये वाढ करून देतो, असे आमीष दाखवत मागील दोन वर्षापासून वारंवार शारीरिक सुखाची मागणी केली होती व मानसिक त्रास दिला होता. त्यामुळे कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, यावरून गडचिरोली पोलिस स्टेशन येथे सोमवार (ता. ८) Zero FIR दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता कलम ७५(२), (७८) (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी महिला आरोग्य सेविकेची प्रकृती सध्या स्थिर असून गुन्ह्याचा पुढील तपास मुलचेरा पोलिस स्टेशनचे पोलिस करत आहेत.

———————————–