Home Gadchiroli माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी उदय धकाते

माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी उदय धकाते

70

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता.११: जिल्हा परिषद (मा. शा.) हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथील माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी उदय धकाते यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने शाळेतील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघांची स्थापना करण्यात येत असून, या संघांच्या माध्यमातून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, माजी विद्यार्थ्यांचे मेळावे तसेच अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

नवनिर्वाचित अध्यक्ष उदय धकाते हे या शाळेचे माजी शाळानायक होते.

या शाळेचे माजी विद्यार्थी सी. पी. अँड बेरार राज्यातील पहिले मेरिटधारक सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व. बी. डी. धकाते सर यांचे पुत्र आहेत. उदय धकाते यांनी सन २०२४ मध्ये शाळेच्या अमृत महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून सुमारे १५०० माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकत्र आणत एक ऐतिहासिक मेळावा घडवून आणला होता. असा भव्य मेळावा देशात इतरत्र कुठेही झाला नसल्याचे नमूद करण्यात येत आहे.

नव्या कार्यकारिणीत मुख्य सल्लागार म्हणून राघवेंद्र मुनघाटे (माजी शिक्षणाधिकारी), उपाध्यक्ष जितेंद्र कोपुलवार, पदसिद्ध सचिव प्राचार्य ई. एच. टेकाम, कोषाध्यक्ष पुष्पलता कुमरे यांची निवड झाली आहे.

सदस्यपदी दादाजी वालको, विश्राम होकम, निलेश दंडवते, समीर कडीवाल, सुरेखा न्यालेवार, अरुण पोगळे, राजेश निखारे, राजेंद्र गव्हारे, शालिनीताई निंबारते आदींची निवड करण्यात आली आहे.

सभेचे संचालन आणि आभार प्रदर्शन सपना देशमुख यांनी केले