श्री प्रभाकरन यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; लॉयड्सतर्फे मेगा रक्तदान शिबिर यशस्वी

21

ग्लोबल गडचिरोली न्यूज
गडचिरोली (Gadchiroli), ता. १७ : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर शाखा ‘लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन’ तर्फे सामाजिक बांधिलकी जपत कोंसरी व सुरजागड येथे मेगा रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल ७७७ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा प्रेरणादायी संदेश दिला. गतवर्षी हा आकडा ५०१ इतका होता.

यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून आदर्श निर्माण केला. त्यांच्या कृतीतून “रक्तदान हे मानवजातीसाठी अत्यंत मौल्यवान कर्तव्य आहे,” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
शिबिरादरम्यान उत्साहपूर्ण व एकात्मतेचे वातावरण अनुभवायला मिळाले. विविध स्तरांतील कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदानाला मानवसेवेचे स्वरूप दिले. या प्रतिसादातून समाजाप्रती असलेली सकारात्मक भावना आणि कंपनीची सामाजिक जाणीव प्रकर्षाने अधोरेखित झाली.

कार्यक्रमात बोलताना श्री प्रभाकरन यांनी समाधान व्यक्त करत सांगितले, “रक्तदान हा साधा उपक्रम असला तरी तो एखाद्याचे जीवन वाचवू शकतो. समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमात पुढाकार घ्यावा.”
तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, अशा मानवतावादी उपक्रमांमुळे समाजातील परस्पर संबंध अधिक दृढ होतात आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या गरजांची पूर्तता करण्यास मदत होते. त्यांच्या प्रेरणादायी आवाहनामुळे अनेकांनी नियमित रक्तदान करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या मेगा रक्तदान शिबिराच्या यशातून कंपनीची सामाजिक बांधिलकी व प्रेरणादायी नेतृत्व अधोरेखित झाले असून, भविष्यातही अशा उपक्रमांना चालना देण्याचा कंपनीचा मानस आहे.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड बद्दल : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड ही एक अग्रगण्य औद्योगिक संस्था असून, औद्योगिक प्रगतीबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजासाठी मोलाचे योगदान देण्यास कटिबद्ध आहे.

 

#Gadchiroli #GadchiroliNews #BloodDonation #MegaBloodDonation #DonateBloodSaveLives #LloydsMetals #CSRActivity #SocialResponsibility #HumanityFirst #BeTheChange #SaveLives #BloodDonationCamp #CommunitySupport #AdivasiArea #Inspiration #Prabhakaran #SocialWork #HealthAwareness #VolunteerSpirit #IndiaCares #PositiveNews #BreakingNews #LatestNews

———————————————–