ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली (Gadchiroli), ता . १८ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘झेप २०२६’ व्यक्तिमत्व विकास शिबिर दि. १८/०४/२०२६ रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले.
शिबिरामध्ये दहावी व बारावीनंतर करिअरचे पर्याय, सायबर क्राईम व सोशल मीडिया जागरूकता, लीडरशिप, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), टाइम मॅनेजमेंट तसेच पॉझिटिव्ह थिंकिंग या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुलजी श्यामकुवर, गडचिरोली नगराध्यक्ष प्रा. सुनिता साळवे, तसेच नगर मंत्री संकेत म्हस्के उपस्थित होते.
विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सतिश चिचघरे, पोलिस विभागातील सिक्युरिटी अधिकारी देविकारा तामशेटवार, विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, जिल्हा प्रमुख प्रा. विकास चित्ते, जिल्हा संयोजक विकास बोदलकर, प्रांत कार्य समिती सदस्य दीक्षा पिंपरे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे ‘झेप २०२६’ शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून, शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.










