Home मराठी सूर्यडोंगरी परीसरात रानटी हत्तींचा वावर

सूर्यडोंगरी परीसरात रानटी हत्तींचा वावर

123

गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रामध्ये येणाऱ्या देलोडा सूर्यडोंगरी बिटमध्ये सोमवार (ता. १५) रात्री इंजेवारी क्षेत्रामधून आलेल्या रानटी हत्तींनी धुडगूस घालत मकापिकाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे शेककरी भयभित झाले आहेत. देलोडा जंगल परीसरात रानटी हत्ती आल्याने नागरिकांनी जंगलात जाऊ नये, असे आवाहनही वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सोबतच सूर्यडोंगरी-देलोडा मार्गसुद्धा बंद केला आहे. दरम्यान, हत्तींनी मका पायदळी तुडवल्याने परीसरातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. नागरिकांनी जंगलामध्ये जाणे टाळावे, असे आवाहन वनरक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.

—————————–