- गडचिरोली :ता. १७:
- देसाईगंज, तालुक्यातील कोरेगाव येथे गेल्या आठ दिवसापासून अस्वलीचा वावर असून आता हे अस्वल चक्क गावातच आल्याने नागरिक घाबरले आहेत. या अस्वलाचा बंदोबस्त वनविभागाने करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
- या परीसरात अस्वल फिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सक्रीय झाले आहेत. गावात रात्रभर पहारा देऊन नागरिकांना रात्री घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. या परिसरात बिबट्याचासुद्धा वावर असून त्याचीही भिती आहे. सध्या शेतात उन्हाळी धानपीक, मका अशी पिके असून शेतकऱ्यांना रात्रीच्या सुमारास राखणीसाठी शेतात जावे लागत आहे. वनविभागाचे गस्ती पथक परीसरात फिरत असून यात परीविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी गव्हाणे, वनपाल कंकलवार, कानकाटे, कांबळे, शेडने, दहीकर आदींचा समावेश आहे.
————————————









