पिपरे दाम्पत्याने बोरकूटे परीवाराला दिल्या शुभेच्छा

74

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली, ता. १९ : भाजपच्या महिला आघाडीच्या गडचिरोली तालुकाध्यक्षअर्चना दिनेश बोरकुटे मु.साखरा ता.जि. गडचिरोली यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश व वास्तुशांती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाजपचे लोकसभा समन्वयक तथा अभियंते प्रमोद पिपरे व भाजप जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहुन बोरकुटे परिवाराची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी दिनेश बोरकुटे, भाजप महिला आघाडीचे शहराध्यक्ष कविता उरकडे व महिला पदाधिकारी उपस्थित होते.