ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ७ जून : माजी खासदार अशोक नेते यांचे अंगरक्षक (PSO) विशेष सुरक्षा विभागात असलेले तुषार मालोदे यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून माजी खासदार नेते यांनी त्यांचा सत्कार केला.

माजी खासदार नेते यांच्याकडे तुषार मालोदे चार – पाच वर्षांपासून अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली नागपूर येथे झाल्याने शुक्रवार (ता. ७) माजी खासदार अशोक नेते यांनी त्यांच्या निवासस्थानी गडचिरोली येथे त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख रामायण खटी, भाजप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सलीम भाई, शाम वाढई, देविदास नागरे पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.









