ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. ११ : जिल्हाधिकारी संजय दैने २० जूनपर्यंत रजेवर असल्याने जिल्हाधिकारी पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
विजय भाकरे यांनी सोमवार (ता. १०) जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी भाकरे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर खरीप पीक कर्ज वाटप तसेच बियाणे, खते व फवारणी औषध उपलब्धतेचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भाकरे यांनी दिले. तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तक्रार निवारणाची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
——————————–









