Home मराठी लोकसभा निवडणुकीमध्ये महिला मोर्चा कार्यकर्त्यां भगिनींनी केलेले कार्य कौतुकास्पद : गीता हिंगे

लोकसभा निवडणुकीमध्ये महिला मोर्चा कार्यकर्त्यां भगिनींनी केलेले कार्य कौतुकास्पद : गीता हिंगे

121

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १९ : आपला जिल्हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. भामरागड, कोरची, अहेरी, सिरोंचा व धानोरा इत्यादी नक्षलग्रस्त तालुक्याच्या भागांमध्ये जाऊन भगिनींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रचार केला. महिला भगिनींनी एकनिष्ठेने व सर्वांच्या सहकार्याने पूर्ण विश्वासाने काम केले. त्यांनी केलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी केले.

महिला मोर्चीची बैठक महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंदा कोडवते, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, जिल्हा सचिव रंजीता कोडापे, वर्षा शेडमाके, लक्ष्मी कलंत्री उपस्थित होत्या. पुढे मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष गीता हिंगे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु माझ्या कार्यकर्त्या भगिनींनी पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा सर्वांच्या सहकार्याने, एक निष्ठेने आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये जोमाने काम करून विजय प्राप्त करू, असा विश्वास महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी बैठकीमध्ये व्यक्त केला. यावेळी सीमा कन्नमवार, अर्चना बोरकुटे ,वैष्णवी नैताम,भूमिका बर्डे, प्रतिमा सोनवणे, पायल कोडापे, अर्चना निंबोड, नीता उंदीरवाडे, सुनीता आलेवार, रेखा उईके, त्रिशा डोईजड, पल्लवी बारापात्रे, नीता बैस,रंजना गेडाम, शिल्पा भोयर, भारती खोब्रागडे, भूमी कोंडावार व महिला मोर्चाच्या अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रास्ताविक डॉ. चंदा कोडवते यांनी केले, संचालन वैष्णवी डोंगरे यांनी केले, तर आभार जिल्हा सचिव वर्षा शेडमाके यांनी मानले.