ग्रामीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प मा.खा.अशोकजी नेते

107

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिं.24 जुलाई

केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. मुद्रा लोणची मर्यादा दुप्पट केली. कौशल्य विकासातून रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना दिली जाणार आहे. नवीन व्यवसाय करणाऱ्यांना यातून प्रोत्साहन मिळेल. याशिवाय शेतकरी वर्गाना यांना सुद्धा बळकटी देणारा अर्थ संकल्प असून या बरोबरचं उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज घेण्याची सुविधा सरकारने केली आहे. नवीन रस्त्यांच्या निर्मितीसाठी, ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी तरतूद केली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा अर्थसंकल्प असून त्याचे मी स्वागत करतो

.