गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्या उत्थानाला सर्वोच्च प्राधान्य देणारे अर्थसंकल्प.. माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज

107

मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर!

 

ग्लोबल गडचिरोली न्यूज

,दि,24 जुलाई .

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या विकासरथाला अधिक बळकटी देणारा 2024-2025 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. यात गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्या उत्थानाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील सर्व समाजघटकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाच्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सुगती प्राप्त होईल, भारत सर्व क्षेत्रात निश्चितच अग्रेसर राहील,असा विश्वास वाटतो.

 

सर्वसमावेशक, विकासाभिमुख तसेच सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आपण त्यांचे स्वागत करतो ,पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारमण यांना धन्यवाद देतो.